दिवस उगवला की रिसोड शहरातील महाविद्यालया मध्ये जा लागत होते. मी बी.ए वर्गात शिकत होतो. तवा मी एका मुलिला पाहिल. ती मृगनैनी, ज्या महाविद्यालया मध्ये शिकत होती, मी पण तिथच शिकत होती. पण दोघांची ओळख, सहवास यास बराच उशीर लागला. ती खेड्यातील मुलगी, रेशमी निळा पायजमा आणि वर महाविद्यालयचा सदरा परिधान करून ती महाविद्यालय मध्ये येई. तिचा रंग नितळ गोरा होता. डोळ्यात संकोचाचे भाव नव्हते. गहरी नजर पण निष्पाप होती. परंतु मला तिच नाव माहित नवत. ज्या दिवशी तिला मी पाहिल होत. तवा तिचे अंत:करण तर सरोजवदना प्रियायार्हसि समान होते. तवा मराठी वाड्रमय विषयाचा सिमिनार होता. कोकाटे सरनी आमाले पोळा आणि गुडिपाडवा विषयी बोलायला सागितले होते.आणि स्वताचे पुर्ण नाव घेऊन, सिमिनार द्याचा होता. तिथच मला तिचे नाव कळाले होते. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर तिच्याच नावा प्रमानेच तिचा अंतरिचा प्रकाश तिच्या मुखावर खेळत होता, तिचे नाव "रोशनी ताईडे" होते. नंतर सिमिनार मध्ये बोलण्याची माझी बारी आली. मी तिच्याकडे पाहिल आणि माझ नाव घेतल "सौरूप" ज्याने करूण तिला माझे नाव कळावेत. मी तिला पाहताच सिमिनारचा विषच विसरून गेलो. आणि पोळा, गुडिपाडवा जागी रक्षाबंधन विषयी बोलू लागलो . कारण मला त्या कमलनयनीला बहिण बनवायचे होते. हे नक्की!