shabd-logo

शिवांश लव्ह स्टोरी

3 June 2023

5 Viewed 5


(भाग-१)

*स्थळ:* डायनिंग टेबल

"गुड मॉर्निंग आई-बाबा....." *ती* डायनिंग टेबलकडे येत बोलते


"गुड मॉर्निंग बाळा...." तिचे बाबा म्हणजेच विकास जाधव बोलतात...




"गुड मॉर्निंग शिवू...." तिची आई म्हणजेच विनिता जाधव बोलते...



"आई नाश्त्याला काय आहे ग आज?...खूप छान वास येतोय..." *ती* खुर्चीवर बसत दिर्घ श्वास घेत बोलते




"तुझ्या आवडीचे पोहे केलेत..खाऊन सांग कसे झालेत ते..." आई तिला पोह्याची प्लेट देत बोलतात



"उममम....आई कसले भारी झालेत ग पोहे..एकंच नंबर...तुझ्या हाताला खरंच खूप भारी चव आहे...I just love you...." *ती* नाटकीपणे तिच्या आईला बोलते



" चल नौटंकी..एवढी मोठी झाली तरी अजून बलिशपणा काही गेला नाही ना तुझा...अग आता 23 वर्षांची झालीस..लग्नाचं बघावं लागेल आता तुझ्या...." आई बोलते




"आई मला नाही ग करायचं इतक्यात लग्न...बाबांनी एवढे कष्ट करून मला इतक्या बिकट परिस्थितीतसुद्धा एवढं शिकवलं ते काय फक्त माझं लग्न लावून देण्यासाठी का?..आई मला अजून जॉब करायचा आहे..तुला आणि बाबांना एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे...." *ती* भरभरून बोलत होती




"बाळा..मी तुला इतकं शिकवलं...सगळे नातेवाईक नको म्हणत असताना सुद्धा तुला आज एवढं चांगलं शिक्षण दिल...आता बस तुझं लग्न झालं तुला चांगला जोडीदार मिळाला म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे..." बाबा जड आवाजात बोलतात..



"बाबा मी लग्न नको असं कुठे बोलतेय...माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की मला इतक्यात लग्न नकोय..मी चांगली सेटल झाले की मग पाहूया लग्नाचं..." *ती* त्यांना समजावत बोलते



"अग असं काय म्हणतेस...." आई पुढे बोलेल की बाबा तिला अडवतात..



"विनिता बरोबर बोलतेय ती...तिला तिचा असा वेळ देऊया आपण..आणि ती लग्नाला नको कुठे म्हणतेय...करेल ती लग्न..." बाबा त्यांना समजावून सांगतात



"तुम्ही बापलेकींनी कधी ऐकलंय का माझं तर आज ऐकाल?..." असं बोलत आई किचन मध्ये जातात तर डायनिंग टेबलवर एकंच हशा पिकतो...


तर ही होती आपल्या नायिकेची फॅमिली...चला तर तुमची ओळख करून देते..

*शिवानी जाधव:* आपल्या कथेची नायिका...दिसायला एखाद्या हेरॉईनपेक्षा कमी नाही...गोरापान चेहरा..पाणीदार घारे डोळे..लांबसडक काळेभोर केस..चाफेकळी नाक..गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक ओठ...हनुवटीवर असणारा तीळ आणि हसल्यावर तिच्या एका गालावर पडणारी खळी..सडपातळ बांध्याची असलेली शिवानी कोणालाही पाहताक्षणी आवडेल अशीच होती...दिसायला एवढी सुंदर असून देखील तिला त्याचा अजिबात गर्व नव्हता...मनमिळाऊ स्वभावाची शिवानी घरात सगळ्यांची लाडकी होती...कोणाच्याही मदतीला सदैव तत्पर असलेल्या शिवनीला समाजसेवेची खूप आवडतं होती...


*विकास जाधव:* शिवनीचे वडील..एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते ते..घरची परिस्तिथी एकदम गरीब नसली तरी श्रीमंतही नव्हती..त्यांनी खुप कष्ट करून शिवानीला MBA ला टाकलं होतं..आणि त्यांच्या कष्टांचं भान शिवानीला पूर्णपणे असल्यामुळे तिने इतर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता अभ्यासावर दिला आणि पूर्ण कॉलेजमधून पहिली आली..


*विनिता जाधव:* शिवानीच्या आई..ह्या हाऊजवाईफ आहेत..विकासरावांच्या कठीण काळात ह्यांनी त्यांना खूप साथ दिली...आज शिवानीच्या एवढ्या मोठ्या अचिवमेंट मागे त्यांचा खूप मोलाचा वाटा होता...


आपल्या शिवनीला पुण्यामधल्या खूप मोठ्या कंपनीत जॉब लागला होता...तिथे कामाला लागून तिला आता एक महिना पूर्ण झाला असेल...तिथले तिचे बॉस म्हणजेच कंपनीचे ओनरपण खूप छान होते..त्यांची आणि शिवानीची चांगलीच गट्टी जमली होती...



_____________________________________________
*दुसऱ्या दिवशी:*

आज शिवानीची खूप घाई चालली होती..कारणही तसंच होतं म्हणा..आज तिच्या बॉसचा मुलगा येणार होता ऑफिसमध्ये...ती त्याच्या बद्दल खूप काही ऐकून होती पण तिने कधी त्याला पाहिलं नव्हतं...अर्थात तो शिक्षणासाठी बाहेरगावी होता हे ती ऐकून होती म्हणून तिने कधी त्याला पाहिलं नव्हतं...आज तो येणार म्हणून हिची एवढी धांदल उडाली होती..आफ्टरऑल फर्स्ट इम्प्रेशन इस युअर लास्ट इम्प्रेशन...

"बाळा अग किती घाई करतेय...आरामात आवर की.." आई तिची उडालेली धांदल बघून बोलते



"अग आई आज मला अजिबात उशीर नाही करायचं...सरांचा मुलगा येणार आहे आज..इम्प्रेशन खराब नको व्हायला म्हणून लवकर चालले मी..." शिवानी घाईत तिचं आवरत बोलते..



"बरं चल काही खाऊन घे..." आई




"आई खरंच नको ग मला काही...मी निघते उशीर होईल नाहीतर...." बोलत शिवानी जातच असते की तिचे बाबा तिला हाताला धरून डायनिंग टेबल कडे घेऊन येतात आणि चेअरवर बसवतात...



"अहो बाबा काय करताय?..मला उशीर होईल ना हो..." शिवानी गोंधळून बोलते



"काही उशीर नाही होत..बस इथे आणि आधी हे खाऊन टाक..." बाबा तिच्या समोर प्लेट ठेवत बोलतात



"अहो बाबा पण...." ती पुढे काही बोलेल की बाबा तिला डोळे वटारून बघतात तसं ती चुपचाप नाश्ता करायला स्टार्ट करते...किचनच्या एका कोपऱ्यात उभं राहून आई भरल्या डोळ्यांनी त्या दोघांकडे बघत होत्या...




"चला बाबा येते मी...." शिवानी त्यांच्या पाया पडत बोलते...



"चल आई...बाय..." म्हणत शिवानी ऑफिससाठी निघून जाते...


_____________________________________________
*स्थळ:* शिवानीच्या ऑफिसच्या बाहेर

शिवानी एका भल्या मोठ्या दिसणाऱ्या ऑफिस बिल्डिंग समोर उभी होती...त्या बिल्डिंगवर दिमाखात *राजाध्यक्ष ग्रुप ऑफ इंदूस्ट्रीज* असं कोरलं होतं..नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येत...ते हसू घेऊनच ती आत इंटर करते तर सगळे तिला बघून जागीच बाद होतात..कारण ती दिसतंच एवढी सुंदर असते..


तिने छान असा ब्लु कलरचा लॉंग कुर्ता घातला होता..त्यावर सिल्वर कलरची छान अशी सर्कल वाली डिझाईन होती...मोकळे सोडलेले ते काळेभोर कमरेपर्यंत रुळणारे केस..एका हातात सिल्वर बांगड्या तर दुसऱ्या हातात घड्याळ...डोळ्यात हलके काजळ आणि ओठांना फक्त लीपबाम..कानात मोठे झुमके..आणि तिच्या त्या कोरीव भुवयांमध्ये लावलेली ती नाजूक काळी टिकली तिच्या रुपात अजून भर घालत होती...


ती आत येते तसं तिची ऑफिसमधली मैत्रीण रेवा तिच्या जवळ येऊन तिला हाक मारते..

"हेय शिवानी....." रेवा



"हाय रेवा...." शिवानी बोलत बोलत तिच्या डेस्ककडे जाते



"अग तू बॉसच्या मुलाला पाहिलं आहे का?...."रेवा एक्ससाईट होऊन विचारते




"नाही ग...का?..." शिवनी



"अग कसला हँडसम आहे बॉसचा मुलगा...एकदम किलर...त्यात त्याची स्माईल तर बोलूच नको...एकदम ढासू दिसतो यार तो..." रेवा




"तू पाहिलंय त्याला?...."शिवानी




"नाही ग....पण सगळे असंच बोलतायेत...." रेवा



"कमाल ऐ रेवा तुझी खरंच...सोड ते जाऊदे...आपण काही इथे पोरं बघायला नाही येत..काम करूया..." शिवानी बोलून कामाला सुरुवात करणारच असते की तिच्या जवळ पिऊन येतो...




"शिवानी मॅडम तुम्हाला मोठ्या सरांनी बोलवलं आहे...." पिऊन



"आलेच...." म्हणत शिवानी तिच्या बॉसच्या कॅबिनकडे निघते....



"मे आय कम इन सर...?" शिवानी



"येस शिवानी...." बॉस म्हणजेच *सुनिल राजाध्यक्ष* बोलतात...



"सर तुम्ही बोलावलात मला?...." शिवानी आत येत विचारते



"होय...तुला माहीत असलेच आज माझा मुलगा येतोय ते..." बॉस



"हो सर...." शिवानी



"मला असं वाटतं की त्याच्या स्वागतासाठी तू असावी..." बॉस बोलतात तसं तिला धक्का बसतो




"सर पण मी...म्हणजे मी आताच जॉईन झाले आहे तर...." शिवानी गोंधळून बोलते




"शिवानी तुझा रेकॉर्ड खरंच खूप छान आहे...आणि मला असं मनापासून वाटतं की तू त्याच्या स्वागतासाठी असावी..." बॉस




"चालेल सर..मी तयारी करायला सांगते..." शिवानी बोलते तसं सर उठतात...



"Okay then....I'll catch you later...." म्हणत निघून जातात

🌸🌸🌸

तर होते आपल्या नायकाचे वडील...
*सुनिल राजाध्यक्ष:* एक दमदार व्यक्तिमत्व...राजाध्यक्ष इंदूस्ट्रीजचे मालक..संपूर्ण बीजनेस वर्ल्ड मध्ये त्यांच्या नावाचा दबदबा होता..दिलखुलासपणे जगणं आणि भरीव असा व्यक्तिमत्व होता त्यांचा...मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे संपूर्ण कंपनीत खेळीमेळीचं वातावरण होत...त्यांच्या वाईफ म्हणजेच *साक्षी राजाध्यक्ष* पण अश्याच होत्या..


ते निघून गेले पण शिवानी अजूनही तिथेच उभी होती..बॉसचा मुलगा येणार ह्या साध्या विचाराने सुद्धा तिच्या छातीची धडधड कित्येक पटीने वाढली होती..मनाला एक विचित्र हुरहूर लागून राहिली होती..का?...ते मात्र माहीत नव्हतं...शेवटी तिने सगळे विचार झटकले आणि कामाला लागली...

🌸🌸🌸


थोड्याच वेळात बाहेर कार थांबल्याचा आवाज आला तसं सगळेजण बाहेर आले..शिवानी पण हातात बुके घेऊन पुढे येते...त्याला बघायला खूप जणांनी गर्दी केली होती...शिवानीला उभं राहायला जागा नव्हती म्हणून शेवटी तिने बुके बॉसच्या हातात दिली आणि ती थोड्या आडोश्याला जाऊन उभी राहिली..

सगळे त्याला बघायला उत्सुक झाले होते इतक्यात कारचा दरवाजा उघडत तो दिमाखात खाली उतरतो...ब्लु कलरचा थ्री पीस सूट..एका हातात मोठ्या डायलचा घड्याळ...तर दुसऱ्या हाताने तो आपले सिल्की केस जे कपाळावर आले होते ते मागे करत होता..त्यामुळे त्याचे ते पिळदार दंड उठून दिसत होते..पायात ब्लॅक शूज...तर हा आहे आपल्या कथेचा नायक... *आयांश राजाध्यक्ष*... अतिशय रागीट असा...मुलींकडे ढुंकूनही न बघणारा...तो आता पर्यंत लंडनमध्ये होता...त्याचं शिक्षण पूर्ण करून तो दोन दिवस आधीच भारतात परतला होता...लाखो मुलींचा क्रश असून सुद्धा त्याला कुठल्या मुलीवर अजून प्रेम झालं नव्हतं....निर्विकार चेहऱ्याने तो गाडीतून खाली उतरतो आणि ऑफिसकडे चालू लागतो...ऑफिस मधल्या सगळ्या मुली तर त्याला डोळे फाडून बघत होत्या..



"बाबा..." म्हणत त्याने आधी सुनीलरावांचे पाय पडले..



"ये..." म्हणत त्यांनी त्याला गळ्याशी लावलं..



"तर हा माझा मुलगा आहे... *आयांश सुनील राजाध्यक्ष*...." बॉस बोलतात



"डॅड ह्या सगळ्यांना काँफेरेन्स रूममध्ये बोलवा...मला जरा बोलायचं आहे..." आयांश बोलतो



"ओके..सगळ्यांनी काँफेरेन्स रूममध्ये या..." म्हणत सुनीलराव आणि आयांश पुढे चालू लागतात...आणि त्यांच्या मागे सगळेजण चालू लागतात...

🌸🌸🌸
_____________________________________________
*स्थळ:* काँफेरेन्स हॉल

सगळेजण काँफेरेन्स हॉलमध्ये जमले होते...शिवानी मिटिंगची पूर्ण तयारी करत होती..समोरचं बॉस आणि आयांश बसले होते..दोघांमध्ये काहीतरी बोलणं चालू होतं..इतक्यात त्याचं लक्ष अचानक समोर बसलेल्या शिवानीकडे गेलं तसं तो तिच्यात हरवून गेला..तिच्या त्या घाऱ्या पाणीदार डोळ्यात तो पुरता अटकला होता..त्याला आजूबाजूचं काडीमात्र भान नव्हतं...तो फक्त आणि फक्त एकटक तिच्या त्या निरासग चेहऱ्याकडे बघत होता...इतक्यात शिवनीने त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने गडबडून त्याची मान डॅडकडे वळवली मग तिने सुद्धा जास्त विचार न करता आपल्या कामाकडे लक्ष दिलं...पण आयांश मात्र राहून राहून तिला बघत होता..ह्याचं त्यालाच जास्त आश्चर्य वाटत होतं कारण कधीच कुठल्या मुलीकडे ढुंकून न बघणारा तो तिला एकटक बघत होता...


इतक्यात त्याचे डॅड त्याची सगळ्यांशी ओळख करून देतात...मग तो पण तिथे बिझी होतो..जवळ जवळ अर्धा एक तास त्यांची मिटिंग चालते...शेवटी सगळ्यांची ओळख झाल्यावर डॅड त्यांना सगळ्यांना जायला सांगतात...पण तो मात्र तिला थांबवण्यासाठी आवाज देणार इतक्यात त्याचे डॅड तिला आवाज देतात...बस त्याला तर हेच हवं होतं😉


"येस सर...." शिवानी तिच्या गोड आवाजात बोलते..तर तिचा आवाज ऐकून इथे त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात...



"आयांश ही आहे शिवानी जाधव..लास्ट मंथमध्ये जॉईन झाली आहे बट खूप छान काम करते..." डॅड तिची पर्सनल ओळख करून देतात




"ओहह...हाय...मी आयांश राजाध्यक्ष..." आयांश तिच्यापुढे हात करत तिला बोलतो



"हॅलो सर...." म्हणत शिवानी त्याच्या हातात हात देते..तिच्या नाजूक हाताचा स्पर्श होताच आयांशला खूप भारी फीलिंग येते तर शिवानीच्या पोटात गुदगुल्या होतात...तसं ती झटकन तिचा हात सोडवून घेते आणि एक क्युट स्माईल देते..तसं तिच्या गालावर खळी पडते आणि आयांश त्यात हरवून जातो.....




"सर मी येते...." म्हणत शिवानी तिथून निघून जाते तरी आयांश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतो



"गेली ती...चल आता...." डॅड हसत बोलतात तसं तो भानावर येतो आणि त्यांच्या मागे चालू लागतो..


_____________________________________________

🌸🌸🌸

"ही आहे तुझी केबिन...कशी वाटली?...." डॅड त्याला त्याच्या केबिनमध्ये घेऊन येत बोलतात तसं तो चौफेर नजर मारतो...


सुंदर अशी व्हाईट इंटिरियर असलेली केबिन होती...एका बाजूला त्याचा टेबल...तर दुसऱ्या बाजूला बसण्यासाठी सोफा...एक भलीमोठी खिडकी ज्यातून खाली चाललेलं सगळं अगदी स्पष्ट दिसत होतं...तर एक ग्लास वॉल होता ज्यातून त्याला बाहेरचा पूर्ण स्टाफ दिसत होता...महत्वाचं म्हणजे त्याला शिवानी दिसत होती कारण तिचा डेस्क त्याच्या केबिनसमोर होता...ते बघून तो कधी नव्हे ते गालात हसतो....



"आवडली का?....."डॅड त्याच्या बाजूला उभे राहून विचारतात तसं तो गडबडून तिच्यावरून नजर हटवतो



"काय डॅड?...." आयांश नजर चोरत विचारतो



"केबिन रे...." डॅड मिश्कीलपणे बोलतात




"हो हो डॅड....छान आहे...." आयांश




"बर..चल मी जातो...." म्हणत ते निघून जातात..मग आयांश व आपल्या खुर्चीवर बसतो आणि शिवानी कडे बघत असतो...त्याच्याही नकळत तो शिवानीकडे खेचला जात होता...

*आता कामाच्या बाबतीत स्ट्रिक असणारा हा माणूस एका मुलीसाठी एवढा वेळ वाया घालवतो म्हणजे तिच्यात खास असं काहीतरी नक्की असले ना❤️✨*

🌸🌸🌸

(क्रमशः)