shabd-logo

धर्मवीर आनंद दीघे आणि सध्याचे राजकारण:-https://maayboli.online/%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%98%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%a7%e0%a5%8d/

12 August 2022

22 Viewed 22
article-image

धर्मवीर आनंद दीघे आणि सध्याचे राजकारण:- धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे या धर्मवीर आनंद दीघे यांच्या चित्रपटाची सुरवातच अगदी योग्य रितीने झाली, कारण सध्याच्या काळातील राजकारण आणि राजकारणातील व्यक्ती पाहून कोणालाही असे वाटणे साहजिक आहे की खरच एखादा राजकारणी माणूस असा असु शकतो का की ज्याचा मृत्यु होवुन इतकी वर्षे लोटली तरी लोकांच्या मनात आजही त्यांच्याबद्दल इतके प्रेम, इतका आदर आहे.

खरच आज धर्मवीर आनंद दीघेंसारख्या राजकारणी माणसाची या देशाला, या समाजाला गरज आहे. कारण सध्याची परिस्थिती ही वेगळीच आहे, सर्वजण फक्त सत्तेच्या हव्यासापोटी राजकारणात येतात आणि आपला स्वार्थ साधून झाला की बाजूला सरकतात. निवडणुकांच्या वेळी सभा, प्रचार घेवून लोकांना ओरडुन ओरडुन सांगतात तुम्ही आम्हाला मत दिले तर आम्ही असे करू तसे करू परंतु खरच जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र एकमेकांवर, एकमेकांच्या पक्षावर ताशेरे ओढत बसतात. परंतु यात सामान्य माणूस मात्र भरडला जातो.

आज खरच आहे का एखाद्या तरी राजकारणातील माणसा मध्ये एवढी हिम्मत की एखाद्या बलात्कार झालेल्या पिडीतेला जसा दीघे साहेबांनी न्याय दिला तसा न्याय द्यायची ? शक्यच नाही उलट आजकाल पिडीतेला न्याय द्यायचा सोडुन आरोपीलाच वाचवण्यात यांना जास्त रस असतो. धर्मवीर दिघेंसारखा माणूस बनायला खरा पुरूषार्थ लागतो.

आज आहे का कोणा राजकारण्यामध्ये एवढी हिम्मत की स्वतःचच न्यायालय थाटून जनतेला योग्य न्याय मिळवून देण्याची. इथे फक्त गरीबांपासुन ते श्रीमंतांपर्यंत सर्वांकडून या ना त्या प्रकारे पैसा लुटला जातो. राजकारण म्हणजे पैसा अशीच सध्या काही लोकांनी राजकारणाची व्याख्या केली आहे. एखादी व्यक्ती जर राजकारणात येवुन देशकल्याण, राज्यकल्याण, समाजकल्याणासाठी झटत असेल तर त्या व्यक्तीवर अतीशय घाणेरडे आरोप करून त्यांना खाली कसे पाडता येइल हे पाहणे इतकेच काय ते राजकारणी लोकांचे काम.

एक काळ असा होता ज्या काळात लोकांना होणारा त्रास पाहून डान्सबार बंद पाडले गेले आणि आजच्या काळात प्रत्येक किराणा दुकानात वाईन आणण्याचे प्रयत्न हे राजकारणी करत आहेत. काय फक्त दारूच्या बाटल्यांमधुनच महसूल गोळा होवुन सरकारी तिजोरी भरते का? काय फक्त या दारूच्या बाटल्या विकुनच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारते का? परंतु कसे आहे ना मी माझा फायदा बघणार फक्त बाकीचे सामान्य लोक गेले तेल लावत अशी यांची वृत्ती झाली आहे.

सध्या देशाला, राज्याला आनंद दीघेंसारख्या माणसाची त्यांच्यासारख्या राजकारणी वृत्तीची गरज आहे. सत्ता कशी चालवावी,एखाद्या राजकारणी माणसाचा दरारा हा कसा असला पाहिजे याच उत्तम उदाहरण म्हणजे दीघेसाहेब. नाहीतर आजकाल सामान्यातला सामान्य माणूस देखील राजकारण आणि राजकारणातील माणसांविषयी अशुद्ध भाषा वापरू लागला आहे. हिंसा ही समाजकल्याण, देशकल्याणासाठी असेल तर ती कधीच चुकीची नसते गरज पडल्यास हिंसा करून न्याय देणारा राजकारणी असला पाहिजे, परंतु सध्या तर चुकीच्या गोष्टींसाठीच हिंसा केली जाते. खरच अशक्य आहे आताच्या या राजकारणी लोकांमध्ये आनंद दिघेंसारखा माणूस असण. आपल नशीब दुर्दैवी की आज आनंद दिघेंसारखा माणूस आपल्यात नाही आणि त्यांच सुदैव की हे असले राजकारण पहायला ते या जगात नाहीत.

More Books by Trupti Deshmukh

1

धर्मवीर आनंद दीघे आणि सध्याचे राजकारण:-https://maayboli.online/%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%98%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%a7%e0%a5%8d/

12 August 2022
1
0
0

धर्मवीर आनंद दीघे आणि सध्याचे राजकारण:- धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे या धर्मवीर आनंद दीघे यांच्या चित्रपटाची सुरवातच अगदी योग्य रितीने झाली, कारण सध्याच्या काळातील राजकारण आणि राजकारणातील व्यक्ती

2

भारतीय शिक्षण पद्धती आणि त्याचा मांडलेला बाजार https://maayboli.online/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/

12 August 2022
0
0
0

वरील शिर्षकावरून आपल्या डोळ्यासमोरून खुप काही गोष्टी येवुन जातात. सध्याची शिक्षण पद्धती आणि ती ज्या स्वरूपात आज अक्षरशः विकत घ्यावी लागते. शिक्षण म्हणजेच विद्या जीला आपण देवी सरस्वती चे नाव देतो अशा स

---