shabd-logo

इतिहास जगवण्याची खरी गरज आहे माणसा....

26 August 2022

21 Viewed 21

मी भारतीय मराठी माणूस. ह्या भारत देशातला तुमच्या मधलाच मराठी मातृभाषेतला असणारा मी.ह्या पवित्र महाराष्ट्राच्या कोकणातल्या खेडेगावातच माझा जन्म झाला. पण तसा लहानपणीच आई बाबांनी शहरात आणल. जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून शहरच माहिती पडल. शिक्षण हि शहरातच झाल.शिक्षणाच नाही काय शहरात असू किंवा त्या खेडेगावात. पण आज मनाला प्रश्न पडला एक आणि पूर्णपणे गोंधळून गेलो?

 भारत माझा देश आहे सारे भारतीय बांधव माझे आहेत. तसेच हे आपले अखंड महाराष्ट्र ज्या थोर दैवताच्या पदस्पर्शाने पावन झाले. ज्या दैवतामुळे आपल्या देवांची मंदिरे आपल्याला बघण्यासाठी मिळतात त्या दैवताला आपण कधीच पाहिले नाही. नुसते चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकापासून ते आजच्या आयुष्याच्या प्रवासापर्यंत आपण फक्त त्या दैवताला पुस्तकाच्या शब्दरूपीच जाणले फक्त. इतिहासाचे पुस्तक हे वर्णन तर करून देते. पण मलाही वाटते मनाला की ह्या माझ्या पवित्र दैवताला बघता याव कायम स्वरूपी त्याच्या सोबत जगता याव..? हाच प्रश्न मला माझा पडला होता आणि त्याच उत्तर देखील मला माझंच शोधायच होत..

 आयुष्य जगताना ह्या भारत देशाचा ह्या आपल्या महाराष्ट्राचा तर अभ्यास सगळ्यांनीच केला असेल. वर्ष उलटून गेली तरी आयुष्यात आपल्या फक्त आपण आपलाच विचार करण्यात कसे गुंतून गेलो हेही लक्ष्यात येणार नाही. ह्या गुंतलेल्या आयुष्यात ज्या दैवतामुळे महाराष्ट्र घडला आणि ज्या दैवतामुळे आज आपण गुलामगिरीच्या दुनियेतून सुटलो आहोत अश्या दैवताचा शोध घ्यायचं राहूनच गेलं की, नुसतं पुस्तकात वाचून ह्या दैवताला जाणून घेतले त्याचे रूप डोळ्यासमोर साक्षात अनुभवणार कधी..आज गेले साडे तीनशे हुनी अधिक वर्ष पलटली तरी ह्या दैवताचे म्हणजेच आपला श्री. छत्रपती शिवाजी महाराज्यांचे नाव त्यांचे कार्य त्यांचा आदर प्रत्येकाच्या मना मनात एक घर करून हृदयी सन्मानाने भरलेला आहे. मग ह्या दैवताला नुसतं पुस्तकी रूपातुनी नाही तर आज त्याला डोळ्यासमोर साक्ष्यात बघता यावे हीच काळाची आज खरी गरज आहे...

article-image

ह्या महाराष्ट्रात सह्याद्री नावाची एक शिवकाळीन दुनिया आहे. जी पाहिली अनुभवून तर हा आपला दैवत तिथे आज हि दिसतो. सह्याद्रीच्या कडेकपारी, नद्या, डोंगर दरी आजही सांगून देतात की हो दैवत आजही जिवंत आहे.गडकोट पाहिले तर इतिहास दिसतो आणि नुसता इतिहास न दिसता तिथे पराक्रमाची यशोगाथा दिसते. ज्या यशोगाथेत हा महाराष्ट्र आपला गुलामगिरीतून मुक्त कसा झाला ह्याची खरी सुरुवात त्या गडकिल्ल्यांवरील आपल्या दैवताच्या  पाऊल खुणेने व स्वराज्यासाठी जीवाची परवा न करता ह्या शिवरायांच्या शूरवीर मावळ्यांच्या बलिदानाने दिसून येते.....

   लढला रे माझा दैवत त्या काळी आपल्यासाठी लढला, म्हणून हा आपला महाराष्ट्र आज गुलामगिरीतून मुक्त होऊन घडला. आज मी मोकळेपणाने श्वास घेऊन जगतोय. महाराष्ट्रात आज सगळेच आनंदाने जगतायत आप आपल्या कौटुंबाचे पोट भरतय. पण तरी आपण एक गोष्ट नक्कीच विसरतोय की त्या दैवताला आज आपण आपल्या पुढील पिढीसाठी जगवला पाहिजे. आज ह्या दैवताचे गडकिल्ले अमर तर आहेतच आणि ते  पुढील प्रत्येक पिढी पर्यंत अमरच राहतील. पण नुसतं नावाला? आपल्याला खरी गरज आहे ह्या महाराष्ट्रातल्या त्या दैवताच्या इतिहासाला जिवंत ठेवण्याची. आज त्या गडकोटांची आवस्था पाहिली तर लाज वाटते लाज की इतिहास आपला त्या निजामशाही, आदिलशाही आणि इंग्रज्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. श्री. छत्रपती शिवरायांनी त्या मावळ्यांनी आपले रक्त सांडून आपले बलिदान दिले पण इतिहास मिटवून दिला नाही. पण आज आपणच लक्ष देत नाही आपला पवित्र इतिहास नाहीसा होत चालाय. मग पुढील पिढीला काय खरा इतिहास समजणार? इतिहास वाचवण्याची खरी गरज आहे मराठी माणसा.

  जे आताच्या काळात वास्तु आहेत तेही आज ढासळत चालेत, काही तर माती खाली पुरून गेलेत. जशी पुढील पिढी नजरेने बघितील तसाच इतिहास समजणार. आजची आवस्था हि आपल्यामुळेच झाली आहे त्या पवित्र ठिकाणाची. इतिहास बघायला जातो म्हणे. जातो आणि काय करतो. येतो फिरून, फोटो काढून, आणि मोठ्या हवसेने त्या गडकोटाच्या दगडावर नाव करून येतो. कित्येकदा आपण आपल पवित्र स्थान घाण करतो. पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन जातो रिकामी झाल्यावर तिथेच टाकून देतो. आणि काही हुशार तर हे स्थान हि सोडत नाहीत व्यसन करण्यासाठी. लाज वाटली पाहिजे लाज.त्या पवित्र स्थानासाठी कितीतरी जीवाचे बलिदान गेलेत.

   राजे खरच माफ करा, तुमच्यामुळे आम्ही आज मोकळा श्वास घेऊ शकलो पण तुम्हालाच आज आम्ही त्या पवित्र ठिकाणी त्या स्वराज्यामध्ये ओळखू नाही शकलो. हा आज महाराष्ट्रातला माणूस इतिहास नावाला वाचतोय राज खरच पुन्हा माफी असावी.. लाज वाटते तर वाटते पण हे सगळं पाहताना जिवंतपणी मेल्यासारखं वाटतय मनाला. राज स्वराज्य पुन्हा उभा नाही करू शकत आता कोणी, पण हेच स्वराज्य टिकवण्यासाठी उचलले पाऊले मी दोन्ही.

मी वाचवणार इतिहास पुढील भावी पिढीसाठी मी पुन्हा त्या मातीत स्वराज्याची बी रुजवणार खऱ्या इतिहासाच्या पाऊल खुणे साठी.सह्याद्रीच्या कुशीत आज मी चालणार त्या डोंगर दरी नद्या मी पुन्हा आनंदात बघणार, तुमचा इतिहास जिवंत करणार, आणि प्रत्येक मावळ्यांचे बलिदान खऱ्या इतिहासाने जगापुढे मांडणार...

गड संवर्धन हि आजच्या काळाची गरज आहे रे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसा. उठ जागा हो, पेटूनी उठ, जाग कर पुन्हा नव्याने इतिहास, गडकिल्ले जिवंत ठेऊनी... दैवताचे चरण त्या मातीला स्पर्श करून गेलेत त्या मातीचा तु रक्षक हो, तीच माती कपाळाला लावून बघ आजही त्या मातीतून प्रत्येक स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा वास दरवळत आहे....

जगता जगता मराठी माणसा इतिहास हि जगव रे,
पुढील पिढीला खरा असणाराच इतिहास दाखव रे...

More Books by Swahit kalambate