ऐका मर्दानों
ऐका मर्दानो शंभू राजांची गोष्ट सांगतो खरी हो ! खरी हो राजे,
स्वाभिमानी थोर स्वराज्य रक्षक किर्ती त्यांची भूवरी ।। धृ ।।
अंगात त्यांच्या क्षत्रिय बाणा मनात अनंत स्वाभिमाना
सिंहाचा छावा त्यांना म्हणा, छत्रपती साजतीं सिंहासना
शिवाजीराजांच्या स्वराज्याची निष्ठा ते जपती उरी हो 111 ।।
' औरंगजेबाला चढला माज मऱ्हांठा बुडवून घेऊ स्वराज
सातं लाखांची काढली फौज यवनशाहीचा जुलूमी साज
दिन दीन करत चालून आला महाराष्ट्राच्या उरावरी हो ।।21।
शंभूराजांनी संघर्ष केला औरंगजेबाला जर्जर केला
लढाया करून यवन थकला फितूरी करण्यात यशस्वी झाला
कपट करूनी बेड्या ठोकल्या शंभूराज्यांच्या पदीकरी हो ।131।
म्हणाला जीवदान देतो मी मुला सरदार मोठा करीन तुला
गड संपत्ती अधिकार भला स्वराज्य तुमचे देई ते मला !
ता नाहीतरी हाल हाल करूनी दाखवीन यमपूरी हो 11411
सिंहाच्या आवेगान विर गर्जला मरणाची भीती देतो कुणाला ?
स्वराज्यासाठी मराठा खपला विश्वास त्यांचा आम्ही जपला
कवडीही मिळणार नाही ! म्हणून थुंकले त्याच्या अंगावरी हो ।151।
फुटकीबादशहा तो क्रोधीत झाला ठार करा रे म्हणाला याला
डोळे फोडले हातपाय तोडला हाल हाल करून जीव घेतला
स्वराज्य रक्षले पाणी सोडून राजांनी प्राणावरी हो ।। 61।
तुळापूरामध्ये इतिहासाची स्वराज्य निष्ठा बलीदानाची
थोर पराक्रमी शंभूराजांची साक्ष धगधगत्या जोतीची
नाना मावळा मुजरा करतो येवून तुळापुरी हो ।। 71।
लेखक : डॉ. जाधव वीटनेरकरशंभूराजे