या प्रांतात मला काहीच इंटरेस्ट नव्हता असं नाही. माणूस होतोच ना. माणूसपणाच्या भावना असणारच ना? पण आपल्या काही प्रायॉरीटीज असतात. वाहवत जाऊन कसे चालेल. स्वातंत्र्य असतंच. मुलांना कुठला बाप काही वाऱ्यावर सोडत नाही. त्यांचा जीव आपल्यात अडकलेला असतो. प्रेमात पडता पण खायचं काय ? कपडालत्ता घरदार सगळं आलच ना? की आपण आदिमानव आहोत अ ss s करत फिरायला . पण प्रेमाची आदिमता ,सामर्थ्य अगाध आहे. भुलावतोच आपण . मीही लुभावलोच परत एकदा. ओलाव्या साठी मुळं शोध घेतच जातात ना ! घरचा थोडाबहुत पैसा , तरुणपणातली बेपर्वाई आणि मुलींविषयीचे सहजाकर्षण असेलेले आमच्यापेक्षा वयाने आणि अपसमजेने मोठी असणारी काही मुले होती.मी त्यांच्यादृष्टीने निरुपद्रवी होतो. पण आमच्या सोबत काहीमुली वावरायच्या आम्ही काहीजणी सोबत असायचो. म्हणून काही ' मोठी ' मुले आमच्या सोबत राहायची. त्यांच्या खाण्या -पिण्याची चर्चा व्हायची गाव केवढं छोटं ? त्यात यांचे प्रताप मोठे वाटणारच ! या मुलांची जगाविषयीची समज मोठी होती. त्या 'टोन'वर आमचं अनेकदा जुळे आणि जुळतेही. शिक्षक मला एकदा म्हणाले, 'तू नारळाच्या झाडाखाली दूध पित असलास तरी लोक काय समजतात ते ओळखायला शिक' मी म्हणायचो- दगडावर आपटलं जाण्याचं किंवा धोपटण्याने झोडपण्याचं भय ' मळक्या कपड्याला, मला नाही' पण तुम्हाला एक सांगतो. या गोष्टीची किंमत तुम्हाला चुकवावी लागते.ओल्यासंग सुक रंगसल जातं.थोड्या दिवसांनी लोक खरं काय ते जाणतातच. हा 'खरं' जाणण्यात थोडा उशीर होतो. पण मी कधीच घाबरलो नाही. आपलं मन पाण्यासारखं प्रवाही ,नितळ असलं म्हणजे झालं. अशा मित्रांची नि माझी भेट व्हायची ती रस्त्याने येता-जाता अथवा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. एकदा बसस्टॉप आलं की दोघांचे रस्ते वेगळे होत. एखाद्या गोष्टीला नकार देण्याची वेळ येते तेव्हा तो ठामपणे दिला की नंतर गोष्टी खूपच सुकर होतात. गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'तील नियम माणसाच्या सर्वच भ्रष्ट आणि अवैध गोष्टी संबंधी आहे. दारू सोडण्याची एकच वेळ असतेय. ती म्हणजे दारुचा पहिला घोट घेण्यापूर्वी.' दारू' ऐवजी तेथे कोणतीही नैतिक कल्पना तिथे ठेवा त्याचे उत्तर तेच आहे. अनेकदा गावात किंवा शाळा-महाविद्यालये, मंडळे, सामाजिक संस्थामध्ये वावरताना अशा प्रकारचे अनुभव येतात. पण माझ्या मते तुमच्यापाशी कुणाहीविषयी कडवटपणा नसेल, अथवा अकारण हेवा दुः स्वास नसेल तुम्ही स्वतःशी प्रामणिक असाल तर काही होत नाही. अन् झालं तर भीक घालायची गरज नाही.आपणच आपले असतो.आपले म्हणणारे लांबून लांबून चालतात. कुणा कुणाला स्पष्टीकरण देणार आणि त्याने काय साधते.शून्य! आपण अकारण आपल्या प्रतिमेची चिंता करतो. प्रतिमा ही अमूर्त गोष्ट आहे. आपण जिवंत वास्तव आहोत. त्यामुळे प्रतिमेच्या चिंतेपायी आपण अनेक अनुभव संवेदना यांना अकारण मुकतो. आपण जसं बोलतो जसं कृती करतो त्यातून आपली प्रतिमा आपोआप घडत जाईल. तिच्या प्रेमात पडण्याचं कारण काय? तुमच्या या खऱ्या माणसात लोक अडकले की त्यांना कधी अपेक्षा भंग सहन करावा लागत नाही. ती तुटत नाहीत. उलट ढोंगी प्रतिमा तुम्हाला पडद्याआडून खूप गोष्टी करायला लावते. तिचंच ओझं अनेकांना पेलता येत नाही. मी तुम्हाला सांगतो या कालावधीत सर्वच शिक्षकांच्या आणि मित्रांच्या लक्षात मी कायमचा राहिलो. कारण अनेकदा मी प्रत्यक्ष समाज व्यवहारात दाखल झाल्यानंतर याच शिक्षकांनी स्वतःहून दखल घेतली. अनेक लोक मागणं मला स्वतःहून सांगतात, 'अरे अमूक नावाचा माणूस तुला शिकवायला होता काय? ते असं असं म्हणत होते.याचा अर्थ तुम्हाला आपलं म्हणणारे तुमच्या गुणवत्तेला आपलं म्हणतात.त्या प्रॉडक्ट च्या घडणीत आपला वाटा आहे,असे छातीठोकपणे सांगणारे उगाजच जोखीम घेत नाहीत.गुणवत्ता हिन पुत्राला, नातेवाईकाला, विद्यार्थ्याला, पाहून तोंड लपविनारे किती असतात.माणसात अधिक उणे,गुणदोषअसणारच!मी त्यांच्यातलाच.पण कुठे थांबावे हे मला थोडंसं कळतं .हेच मी जर अंतर्गत मूल्यमापन अथवा गुणदान या गोष्टींच्या नादी लागून माझं विद्यार्थी म्हणून अस्तित्व पुसलं असतं तर ! लोकानी केलेल्या आपल्या मूल्यापेक्षा आपण स्वतः जाणलेले आपल्या अस्तित्वाचे मूल्य सगळ्यात मोठे नसते का? तुमच्याबरोबर कायमचा राहतो तो तुमच्या आतला माणूस. बाकी भंपक गोष्टी त्या क्षणीच वाऱ्यावर जातात. एखाद्या विद्यार्थिनीने आपल्या मोहकतेची क्षणिक भूरळ एखाद्या शिक्षकाला मित्राला घातलीही असेल पण त्यांच्या लक्षात अधिक राहिली असेल ती या कुठल्याही गोष्टींना भीक न घालणारी एखादी बंडखोर विद्यार्थिनी !