स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य*
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *रयतेने रयतेच्या हिताकरीता चालवलेला एक समाज* *************************************** 📜 २१ एप्रिल इ.स.१६५६ वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल! १६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्यांच्या तुर्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते –मुरारबाजी देशपांडे महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्यांकडे काम करायचे.शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २१ एप्रिल इ.स.१६७२ बहामनी राज्याच्या पाच शाह्या झाल्यावर कुत्बशाहीची स्वतंत्र सल्तनत इ. स. १५१२त सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपादनास सुरूवात केली त्यावेळी अब्दुल्ला कुत्बशहा राज्य करीत होता. तो २१ एप्रिल १६७२ रोजी निवर्तला. त्याच्यानंतर अबुल हसन ऊर्फ तानाशहा कुत्बशहा झाला. त्याने इ. स. १६७५ च्या अखेरीस मुसाफरखानास दिवाण पदावरून दूर केले. त्यावेळी राज्याचा सर्व कारभार मादण्णाकडे आला. मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा यांनी कर्नाटकाची व्यवस्था लाविली. छत्रपती बशिवाजी महाराजांची भेट तानाशहाशी घडवून आणिली. हिंदू-मुसलमान धर्म भेदास गौणत्व देऊन जीवनात समरस झ